top of page
नाम
नाम
वाक्यात येणाऱ्या शब्दपांपैकी जे शब्द प्रत्यक्षात किंवा काल्पनिक असलेल्या
वस्तुंची नावे असतात त्यांना नामे असे म्हणतात
नामाचे एकूण ३ प्रकार पडतात
-
सामान्य नाम
-
विशेष नाम
-
भाववाचक नाम
सामान्य नाम
एकाच जातीच्या पदार्थंतील सामान गुणधर्मामुळे त्या वस्तूला मिळालेले नाव म्हणजे नाम होय
उदा. मुली , मुले , शाळा , पुस्तक
विशेष नाम
जे नाम एकाच जातीच्या विशिष्ट व्यक्तीच्या , प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध करते त्या नावाला विशेष नाम असे म्हणतात
उदा . हिमाचल , गंगा , यमुना , रामदास
भाववाचक नाम
ज्या नामामुळे एखाद्या पर्यांमधील किंवा पदर्थामधील गुणांचा , भावांचा अथवा धर्माचा बोध होतो त्या नामाला भाववाचक नाम असे म्हणतात
उदा . दुःख , आनंद .
bottom of page