समास
समास
शब्दाच्या एकत्रीकरणास समास असे म्हणतात , तयार होणाऱ्या शब्दास सामासिक शब्द असे म्हणतात.
"सम + अस" या संस्कृत धातूपासून समास हा शब्द तयार झाला असून त्याचा अर्थ एकत्र करणे असा आहे .
उदा. बटाटे घालून केलेला वडा असे न म्हणता आपण बटाटेवडा असे म्हणतो .
समासाचे प्रकार
समासात कमीत कमी दोन शब्द किंवा पदे एकत्र येतात , दोन शब्दांपैकी कोणत्या पदाला वाक्यात अधिक महत्व म्हणजे कोणत्या पदाबद्दल आपल्याला आधीक बोलायचे आहे यावरून समासाचे चार प्रकार पडतात.
ते पुढीलप्रमाणे
-
पहिले पद प्रमुख असेल तर अव्ययीभाव समास.
-
दुसरे पद महत्वाचे असेल तर तत्पुरुष समास .
-
दोन्ही पदे महत्वाची असेल तर द्वंद्व समास .
-
दोन्ही पदे महत्वाची नसून त्यावरून तिसऱ्याच पदाचा बोध होत असेल तर बहुव्रीही समास .
1.अव्ययीभाव समास
जेव्हा समासातील पहिले पद बहुदा महत्त्वाचे असते या या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो तेव्हा अव्ययीभाव समास होतो
उदा.
-
यथाशक्ती - शक्तीप्रमाणे
-
प्रतिदिन - प्रत्येक दिवशी
-
प्रतिक्षण - प्रत्येक क्षणाला
-
आजन्म - जन्मापासून
-
यथान्याय - न्यायाप्रमाणे
-
यथाक्रम - यथाप्रमाणे
-
बिनधास्त - धास्ती शिवाय
-
बेशक - शंका न घेता
-
गैरहजर - हजेरी शिवाय
-
घरोघरी - प्रत्येक घरी
-
वारंवार - प्रत्येक वारी
2.तत्पुरुष समास
या समासातील दुसरे पद महत्वाचे असून समासाचा विग्रह करताना विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो .
उदा.
-
महामानव - महान असलेला मानव
-
राजपुत्र - राजाचा पुत्र
-
तोंडपाठ - तोंडाने पाठ
-
गायरान - गाईचे रान
-
वनभोजन - वनातील भोजन
-
गुणहीन - गुणने हीन
-
सेवानिवृत्त - सेवेतून निवृत्त
-
राजवाडा - राजाचा वाडा
-
शेतकरी - शेती करणारा
-
नाइलाज - इलाज नसलेला
-
घनश्याम -घनासारखा श्याम
-
हिरवागार - खूप हिरवा
-
महाराष्ट्र - महान असे राष्ट्र
-
पंचवटी - पाच वाडांचा समूह
-
साखरभात - साखर घालून केलेला भात
द्विगु समास
ज्या कर्मधारय पहिले पद संख्याविशेषण असते व या सामासिक शब्दातून एक समूह सुचविला जातो त्यास द्विगु समास म्हणतात
उदा.
-
बारभाई - बारा भावांचा समुदाय
-
त्रैलोक्य - तीन लोकांचा समुदाय
-
पंचवटी - पाच वाडांचा समूह
-
नवरात्र - नऊ रात्रींचा समूह
-
सप्ताह - सहा दिवसांचा समूह
3.द्वंद्व समास
ज्या समासातील दोन्ही पदे महत्वाची असतात त्यास द्वंद्व समास असे म्हणतात.
द्वंद्व समासाचे ३ प्रकार पडतात
-
इतरेतर द्वंद्व समास
-
वैकल्पिक द्वंद्व समास
-
समाहार द्वंद्व समास
इतरेतर द्वंद्व समास
या सामासिक शब्दाचा विग्रह करताना आणि , व या समुच्चयबोधक उभयान्वयी
अव्ययाचा वापर करावा लागतो यातील दोन्ही पदे महत्वाची असतात .
उदा.
-
आईवडील - आई आणि वडील
-
कृष्णार्जुन - कृष्णा आणि अर्जुन
-
बहीण भाऊ - बहीण व भाऊ
-
विटी दांडू - विटी आणि दांडू
-
रामलक्ष्मण - राम आणि लक्ष्मण
वैकल्पिक द्वंद्व समास
या सामासिक शब्दाचा विग्रह करताना अथवा, किंवा या समुच्चयबोधक उभयान्वयी
अव्ययाचा वापर करावा लागतो. यामध्ये विरुद्धार्थी शब्द असतात
उदा.
-
मागेपुढे - मागे किंवा पुढे
-
बरेवाईट - बरे अथवा वाईट
-
खरेखोटे - खरे किंवा खोटे
-
पापपुण्य - पाप किंवा पुण्य
-
पंधरा सोळा - पंधरा किंवा सोळा
-
छोट्यामोठ्या - छोट्या किंवा मोठ्या
समाहार द्वंद्व समास
ज्या सामासिक शब्दांचा विग्रह करतांना त्यातील तशाच प्रकारच्या आणखी शब्दांचाही आर्तभाव केला जातो त्याला समाहार द्वंद्व समास असे म्हणतात
उदा.
-
चहापाणी - चहा पाणी वगैरे
-
चटणीभाकर - चटणी भाकर व इतर पदार्थ
-
खाणेपिणे - खाणे पिणे व इतर पदार्थ
-
चहापाणी - चहा ,पाणी व इतर फराळाचे पदार्थ
-
भाजीपाला - भाजी , पाला व तत्सम वस्तू
-
केरकचरा - केरकचरा व इतर टाकाऊ पदार्थ
-
मीठभाकर - मीठ , भाकरी व इतर साधे खाद्यपदार्थ
4.बहुव्रीही समास
ज्या सामासिक शब्दांची दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्या पदाचा बोध होतो त्यास बहुव्रीही समास असे म्हणतात
उदा.
-
लंबोदर - लांब उदर ( पोट ) असलेला
-
गजानन - गजाचे आहे आनन ज्याला तो ( गणेश )