top of page
अभिनंदन पत्र
दिनांक : १० - १० - २०१९
प्रति,
मा. व्यवस्थापक,
अक्षरमैत्र वाचनालय,
जुनेशहर,
अकोला- XXX XXX
महोदय,
आदर्श विद्यालयातर्फे आपले मन:पूर्वक अभिनंदन! शाळेत येताना विविध ठिकाणी लागलेले आपल्या जाहिरातीचे बॅनर वाचले. अक्षरमैत्र वाचनालयातर्फे आपण दुर्मीळ पुस्तकांचे प्रदर्शन भरवीत आहात, ही खरोखरच प्रशंसनीय बाब आहे.
काही पुस्तके कायमस्वरूपी संग्रही ठेवण्यासारखी असतात. परंतु ती सहजासहजी उपलब्ध होऊ शकत नाहीत. आपल्या प्रदर्शनातून अशी पुस्तके मिळू शकतील ही स्वागतार्ह गोष्ट आहे. म्हणूनच आपल्या या उपक्रमाबद्दल पुनश्च एकदा अभिनंदन! कळावे,
आपली नम्र,
सुजया कुलकर्णी
आदर्श विद्यालय,
अकोला-xxxxxx
e-mail : abc@xxxx.com
bottom of page