शब्दयोगी अव्यय
शब्दयोगी अव्यय
शब्दाला जोडून येणारे
उदा.
-
त्यामुळे
-
वाचण्यासाठी
-
घराकडे
-
झाडाखाली
-
शाळेसमोर
यात मुळे, खाली, साठी, कडे, समोर, शब्दयोगी अव्यय आहेत .
शब्दयोगी अव्ययाचे खालील प्रकार पडतात
-
कालवाचक - नंतर, आधी, पुढे, पूर्वी.
-
स्थलवाचक - आत, बाहेर, अलीकडे , पलीकडे, मध्ये, समोर, जवळ, पाशी.
-
करणवाचक - करवी, योगे, हाती, कडून.
-
हेतूवाचक - करीत, सती, करणे, अर्थी , प्रीत्यर्थ, निमित्त, स्तव.
-
व्यतिरेकवाचक - विना, शिवाय, खेरीज, परत, वाचून, व्यतिरिक्त.
-
तुलनावाचक - पेक्षा, तर, तम, मध्ये , परिस,
-
योग्यतावाचक - सामान, सम, जोगा, सारखा ,योग्य, प्रमाणे
-
कैवल्यवाचक -च , ना, मात्र, पण, फक्त, केवळ.
-
संबंधवाचक - विषी , विषयी , संबंधी,
-
संग्रहवाचक - सुद्धा, देखील, हि , अन, बरिक ,
-
साहचर्यवाचक - सांगे, सह, बरोबर , सकट , सहित, निशी, सावे, समवेत.
-
भागवाचक - पैकी , पोटी, आतून.
-
विनिमयवाचक - बद्दल , ऐवजी, जागी, बदली
-
दिकवाचक - प्रत , प्रति, कडे, लागी,
-
विरोधवाचक - विरुद्ध , वीण , उलटे, उलट,
-
परिणामवाचक - भर.