top of page

शब्दसिद्धी

शब्दांची उत्पत्ती कशी झाली आहे म्हणजेच शब्द कसा तयार झाला आहे यालाच शब्दसिद्धी असे म्हणतात. 

तत्सम - संस्कृत मधून जसेच्या तसे मराठीत आलेल्या म्हणजेच त्यांच्या मूळ रूपात बदल न झालेल्या शब्दांना तत्सम शब्द म्हणतात 

उदा.

  • राजा 

  • मंदिर 

  • गुरु 

  • भगवान 

  • कन्या 

  • धर्म 

  • संत 

  • जल 

  • शिखर 

  • पुण्य 

तदभव शब्द - संस्कृत मधून मराठीत येताना ज्या शब्दांच्या  बदल झाला आहे त्यांना तदभव शब्द म्हणतात

उदा. 

  • गृह - घर 

  • दिप - दिवा 

  • पाय - पाणी 

  • मर्कट - माकड 

  • पंक -पंख 

  • भ्राता - भाऊ 

  • अज्ञानी - अडाणी 

  • कारण - कान 

  • ग्राय - गाय 

  • क्षेत्र - शेत 

देशी शब्द - जे शब्द मूळ महाराष्ट्रातील रहिवाशांच्या बोलीभाषेतील मानले जातात त्यांना देशी शब्द म्हणतात 
 उदा.

  • गार 

  • धोंडा 

  • ओटा 

  • लाकूड 

  • डोके 

  • झोप 

  • खुळा 

  • रेडा 

  • कंबर 

परभाषीय शब्द - संस्कृत व्यतिरिक्त इतर भाषांमधूनही मराठीत शब्द आलेले आढळतात .

उदा. 
कानडी - भाकरी , तूप , नाथ , 
गुजराती - दादर , घी , डबा , दलाल 
इंग्रजी शब्द - एजेंट , टेबल , बस , डॉक्टर, सायकल , सिनेमा, इ. 
हिंदी - दिल, करोड, डाँ, बात, भाई, और , नानी . 
पोर्तुगीज  - बटाटा, तंबाखु , पगार, फणस , हापूस, लोणचे, बिस्कीट . 
फारसी - हकीकत , सामना , पोशाख, खाना , कामगार, गुन्हेगार,
अरबी - मेहनत , हुकूम, खर्च, मंजूर , जाहीर, इनाम, 

Headquarter-Aurangabad, Maharashtra

pin code-431135

  • Instagram
  • यूट्यूब

© 2023 by Buddy Tayari. All Rights Reserved 

bottom of page