आत्मकथन
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे दिलेल्या घटकाचे आत्मवृत्त लिहा
घटक-फळा
-
उपयोग
-
फळ्याचे वैशिष्ट्य (कोणता फळा)
-
फळा
-
खंत
-
महत्त्व
-
आनंद
आत्मवृत्त
मी फळाबोलत आहे…
होय मी फळा बोलत आहे. रोजच्या परिचयाचा तुमच्या शैक्षणिक प्रवासात महत्त्वाचा घटक. माझ्या जन्माबददलसांगायचे तर शाळा आणि फळा आम्ही एकत्रच आलो. शाळा जन्माला आली आणि त्याचबरोबर माझाही जन्म झाला. वर्गाच्या चार भिंतीपैकी एका भिंतीवर फक्त माझाच हक्क असतो. खडू आणि डस्टरह तर मास दोन हातच जणू. त्यांच्याशिवाय माझ्या अस्तित्वाला अर्थच उरणार नाही. तुम्हां सर्वांच आणि शिक्षकांचे स्वागत करीत मी दिमाखाने उभा असतो.
दररोज सकाळी शाळा भरण्याआधी शिक्षक किंवा विदयार्थी मला स्वच्छ करून माझ्यावर सुलेखन करतात. रोजचा हजेरीपट लिहिताना माझ्या मधोमध दररोज सुंदर सुंदर सुविचार लिहिले जातात. विदयार्थ्यांना कोणताही विषय शिकवायचा असो, कोणताही घटकसमजावताना माझ्यावरलेखन करुन अधिकसुस्पष्ट करून सांगितले जाते. माझा सर्वांत जास्त उपयोग होतो तो चित्रकला आणि गणिताच्या शिक्षकांना. हे दोन विषय फळ्याशिवाय शिकवताच येत नाहीत. अशा वेळी विदयार्थी माझ्याकडे लक्ष देऊन तो विषय समजून घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मला खूप समाधान वाटते.
तुमच्या दृष्टीने मी वस्तू म्हणून निर्जीव असलो तरी मलाही भावभावना आहेत. मला वापरून झाल्यानंतर स्वच्छ ठेवले की खूप छान वाटते. वर्गातील लिखाणाव्यतिरिक्त इतर अनेक ठिकाणी माझा उपयोग होतो. शाळेच्या प्रवेशद्वारात नोटीसबोर्डसाठी माझा वापर होतो. तसेच वर्षभरात भारतात साजऱ्या होणाऱ्या प्रत्येक सणानिमित्त त्या त्या सणांची सुंदर चित्रे माझ्यावर रेखाटली जातात आणि सर्वधर्मसमभावाचे महत्त्व दाखवून दिले जाते.
काळारंग आणि चौकोनी आकार ही माझी वर्षानुवर्षांपूर्वीची ओळख आता आधुनिक युगात बदलत चालली आहे. संगणक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी कॉन्फरन्सरूममध्ये मी सफेद किंवा हिरव्या रंगामध्ये दिसतो. शाळेतही आता स्मार्टबोर्ड म्हणून माझी नवीन ओळख झाली आहे. तेव्हा खडूने काही लिहावयाचे असल्यास काळा किंवा हिरवा फळा आणि दृक्-श्राव्य माध्यमाचा वापर करावयाचा असल्यास सफेद फळा असे आम्ही दोघेही आता शाळेत एकत्र वावरत असतो. बदलत्या काळानुसार सगळे बदलही स्वीकारायला हवेत हेच खरे.
एका गोष्टीचे मात्र वाईट वाटते. कधी कधी वर्गातील काही खोडकर, बेशिस्त शिक्षकांच्या गैरहजेरीत माझा दुरुपयोग करतात. माझ्यावर असंबद्ध आणि आदोपार असे काहीही लिहून ठेवतात. शिक्षकांची किंवा मुलींची कार्टून्स काढून त्यांना चिडवतात. त्या वेळी त्यांना समजावून सांगावे असे वाटते. परंतु बोलू शकत नाही याची खंत वाटते. मात्र असा माझा दुरुपयोग विदयार्थ्यांनी करू नये एवढेच सांगावे वाटते.