top of page

प्रसंगलेखन

नाशिक जिल्हा परिषद शिक्षण विभाग, नाशिक आयोजित आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा

पारितोषिक वितरण समारंभ

दिनांक : २७ डिसेंबर

प्रमुख पाहणे - माननीय शिक्षणाधिकारी, नाशिक

वेळ : सकाळी ९.०० वाजता

वरील समारंभप्रसंगी तुम्ही तुमच्या लहान भावाच/बहिणीच कौतुक करण्यासाठी उपस्थित होता अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.

प्रसंगलेखन :

            'नाशिक जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे आंतरशालेय वक्तृत्वस्पर्धा करण्यात आली होती. तिचा पारितोषिक वितरण समारंभ दिनांक र डिसेंना सकाळी ए वाजता पार पडला.

            माझी बहीण कु. रिया हिने या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला होता. त्याम आणि आई-बाबा तिचे कौतुक पाहण्यासाठी निमंत्रित म्हणून हजर राहिलो होतो. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत होता.

           प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक विभागाचे शिक्षणाधिकारी माननीय श्रीयुत मनोहर सातपुते यांना निमंत्रित करण्यात आले होते. निवेदकाकडून रियाच्या नावाचा उल्लेख होताच माझ्या आईबाबांच्या आनंदाला पारावार उरला नाही. डोळे भरून ते तिचे कौतुक पाहू लागले. रिया बक्षीस स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर पोहोचली. अत्यंत आत्मविश्वासाने ती पाहुण्यांसमोर उभी राहिली. सर्वप्रथम तिने मान्यवरांना वाकून नमस्कार केला आणि प्रेक्षकांनाही अभिवादन करून बक्षीस स्वीकारले.

             तिला दोन शब्द बोलण्याची संधी दिली तेव्हा तिने आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे आभार मानले आणि विशेष म्हणजे आपल्या आईवडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. त्या वेळी माझ्या आईबाबांचा ऊर अभिमानाने भरून आला. मला तर इतका आनंद झाला की, मी सर्वांमध्ये उभा राहून टाळ्या वाजवू लागलो. प्रेक्षकानाहा टाळ्यांचा कडकडाट करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. माझ्या बहिणीचे कौतुक होताना पाहून मलाही अभिमान वाटू लागला; आपणही अशीच उत्तम कामगिरी करून आईवडिलांना आनंद दयावा, त्यांना कृतकृत्य करावे, असे मला मनोमन वाटल.

Headquarter-Aurangabad, Maharashtra

pin code-431135

  • Instagram
  • यूट्यूब

© 2023 by Buddy Tayari. All Rights Reserved 

bottom of page