अर्थालंकार
या प्रकारात वाक्यातील अर्थामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते
-
उपमा
दोन वस्तू मधील साधर्म्य दाखविण्यासाठी परी, प्रमाणे, परीस, सारखा ,सम ,समान, यासारख्या शब्दांचा वापर केलेला असतो तेथे उपमा अलंकार होतो
उदा.
-
मुंबईतील घरे मात्र लहान कबुतरांच्या कोरड्या सारखी
-
सावळा रंग तुझा पावसाळी नभापरी
-
असेल तेथे वाहात सुंदर दुधासारखी नदी
2. उत्प्रेक्षा
उपमेय हे जणू उपमानचआहे असे दर्शविण्यासाठी गमे, वाटे, भासे ,जणू , काय ,की यासारखे शब्द वापरले जातात तेव्हा उत्प्रेक्षा हा अलंकार होतो
उदा.
-
ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू
-
त्याचे अक्षर जणू काय मोतीच
-
हा आंबा जणू साखरच
-
आकाशातील चांदण्या जणू फुलांची पखरण
3.आपन्हुती
आपन्हुतीचा अर्थ लपवणे असा होतो, ज्यात उपमेय लपवून ते उपमानच आहे असे दर्शविले जाते
उदा.
-
हा आंबा नाही, ही साखरच आहे.( उपमेय- मूळ वस्तू उपमान- देण्यासाठी वापरलेली वस्तू)
-
ओठ कशाचे, देठची फुलल्या परिजातकाचे
4.अनन्वय
ज्यावेळी उपमेयाची तुलना दुसऱ्या कशाशीही होऊ शकत नाही म्हणून ती उपमेयाबरोबरच केली जाते, तेव्हा अनन्वय अलंकार होतो एखाद्या घटकाची तुलना स्वतःबरोबरच करणे.
उदा.
-
आहे ताजमहाल एक जगती तोच त्याच्या परी
-
झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु परंतु यासम हा
5.रूपक
जेव्हा उपमेय आणि उपमान यात भेद नसून दोन्ही अगदी एक रूप आहेत असे दर्शविले जाते तेव्हा रूपक अलंकार होतो
उदा.
-
एक देह देवाचे मंदिर यात आत्मा परमेश्वर
-
वाघिणीचे दूध प्याला बाग बच्चे फाकडे
-
कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा
-
जिथे माणुसकीची यंत्र अखंड चालू असतात
6.अतिशयोक्ती
एखादी कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगणे याला अतिशयोक्ती असे म्हणतात
उदा.
-
ती रडली समुद्राच्या समुद्र
-
तुझे पाय असे बसतात जणू हवेवर नाचतात
-
जो अंबरी फळता खूर लाहलाहे
-
तो चंद्रमा निज तानुवरी डाग लागे
7.दृष्टांत
एखादा विषय पटवून सांगण्यासाठी एखादा दाखला दिल्यास दृष्टांत अलंकार होतो हा अलंकार साधर्म्यावर आणि वैधर्म्यावर भेद दर्शवितो
उदा.
-
लहानपण देगा देवा , मुंगी साखरेचा रवा
ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार
8.विरोधाभास
वरकरणी विरोध पण वास्तविक तसा विरोध नसतो तेव्हा विरोधाभास अलंकार होतो
उदा.
-
जरी आंधळी मी तुला पाहते
-
सर्वच लोक बोलू लागले तर कोणीच ऐकत नाही
9.चेतनागुणोक्ती
निर्जीव तसेच मानवीकृत कल्पना या सजीवांप्रमाणे कृती करतात असा जेव्हा आरोप केला जातो, तेव्हा चेतनगुणोक्ती अलंकार होतो
उदा.
-
कुटुंबवत्सल इथे फणस हा कटी खांद्यावर घेऊन बाळे
-
डोकी अलगद घरे उचलती ,काळोखाच्या उशीवरूनी
-
चाफा बोलेना,चाफा चालेना
चाफा खंत करी, काही केल्या फुलेना
10.अर्थान्तरन्यास
एखाद्या सामान्य विधानाला समर्थनार्थ विशेष उदाहरणे किंवा विशेष उदाहरणावरुन सामान्य सिद्धांत काढला जातो तेव्हा अर्थान्तरन्यास अलंकार होतो
उदा.
-
कठीण समय येता कोण कामास येतो
-
अत्युच्च पदी थोरही बिघडतो हा बोल आहे खरा
11.स्वभावोक्ती
जेव्हा कोणालाही प्राणी, स्थळ, वस्तू, या प्रसंगाचे हुबेहूब पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केले जाते तेव्हा त्याला स्वभावोक्ती अलंकार म्हणतात
उदा.
-
मातीत ते पसरिले अतिरम्य पंख, केले वरी उदर पांडुर निष्कलंक
-
चिमुकली पगडी झळके शिरी
चिमुकली तलवार धरे करी
चिमुकला चढवी वर चोळणा
चिमुकला सरदार निघे रणा
12.व्याजस्तुति
बाहेरून स्तुती पण आतून निंदा किंवा बाहेरून निंदा पण आतून स्तुती असेल तर व्याजस्तुति अलंकार होतो
उदा.
-
होती वंदन चंद्राच्या दर्शनाचीच आस ती
अर्धचंद्र तू द्यावा, कृपा यातून कोणती?
13.पर्याययोक्ती
एखादी गोष्ट सरळ शब्दात न सांगता ती अप्रत्यक्ष रीतीने सांगणे आला पर्याययोक्ती म्हणतात
उदा.
-
तू तर उंबराचे फूल आणायला सांगितली (अशक्य गोष्ट)
-
तो सध्या बिन भाड्याच्या खोलीत आहे (तुरूंगात
14.सार
वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो तेव्हा सार हा अलंकार होतो
उदा.
-
अधिकच मर्कट तशात मद्य प्याला झाला तशाच तरी त्याला वृश्चिक दंश त्याला
15.अन्योक्ती
दुसऱ्याला उद्देशून केलेले बोलणे म्हणजे अन्योक्ती, ज्याच्याबद्दल बोलायचे त्याच्याबद्दल काहीच न बोलता दुसऱ्याला उद्देशून बोलणे म्हणजे अन्योक्ती
उदा.
-
येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक
हे मूर्ख किमतीही नसे विवेक
रंगावरून तुजला म्हणतील काक
16.संसदेह
उपमेय व उपमान कोणते असा संशय निर्माण होऊन मनाची जी द्विधा अवस्था होते त्यावेळी संसदेह अलंकार होतो
उदा.
-
हा दोरखंड की साप
-
कोणता मानू चंद्रमा भूमीवरचा की नभीचा चंद्र कोणता वदन कोणते
17.भ्रान्तिमान
उपमानाच्या जागी उपमेयच आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी कृती घडली तर तिथे भ्रान्तिमान अलंकार होतो
उदा.
-
प्रलाशपुष्प मानोनि शुंकचंचू मध्ये अलि
तोही जांभुळ मानोनि त्यास चोचीमध्ये धरी
18.व्यतिरेक
उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखविली जाते
उदा.
-
अमृताहुनी गोड नाम तुझे देवा कामधेनुच्या
-
दुग्धाहुनही ओझ हिचे बलवान