top of page

बातमीलेखन

पुढील विषयावर बातमी तयार करा : 

३ जानेवारी रोजी आदर्श विद्यालय, नगर या शाळेत 'क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.

बातमीलेखन: 

लेक शिकवा अभियान 

आमच्या वार्ताहराकडून

 

       नगर, दि. ३ जानेवारी : आदर्श विदयालय, नगर या शाळेने ३ जानेवारी हा दिवस क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिन म्हणून साजरा केला.

शाळेच्या मुख्याध्यापकांच्या हस्तेसावित्रीबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली. नंतर एका विद्यार्थ्याने सावित्रीबाईंचा जीवनपरिचय करून देणारे, भाषण केले, तर काही विदयार्थी-विद्यार्थिनींनी मिळून तत्कालीन परिस्थितीचे दर्शन घडवणारी एक नाटिका सादर केली. ज्यात जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मुलींच्या शिक्षणासाठी करावा लागणारा खडतर प्रवास अभिनयाद्वारे दर्शवण्यात आला. लेक शिकवा' या अभियानांतर्गत मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे भित्तीफलक आणि उद्बोधनात्मक विधाने विदयार्थ्यांचे लक्ष वेधून घेत होती.

 

शाळेच्या मुख्याध्यापकांनी विदयार्थ्यांकडून त्यांच्या बरोबरीने शिकणाऱ्या विद्यार्थिनींविषयी आदर बाळगण्याची, त्यांना सहकार्य करण्याची व त्यांचे रक्षण करण्याविषयी प्रतिज्ञा म्हणून घेतली.


सरतेशेवटीसर्व विदयार्थ्यांना सावित्रीबाईंच्या जन्मदिनानिमित्त गोड खाऊ वाटण्यात आला आणि समारंभाची सांगता झाली.

Headquarter-Aurangabad, Maharashtra

pin code-431135

  • Instagram
  • यूट्यूब

© 2023 by Buddy Tayari. All Rights Reserved 

bottom of page