वृत्ते
वृत्ते
हा भाग व्यवस्थित समजण्यासाठी खालील महत्वाचे घटक लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
गद्य -आपल्या मनातील विचार आपण जसे बोलतो तसे सरळ बोलून दाखवणे याला गद्य असे म्हणतात
उदा.
-
आज गोकुळात रंग खेळतो आहे, त्यामुळे राधिके तुझ्या घरी जरा जपून जा.
पद्य -आपल्या मनातील विचार ठराविक क्रमाने लिहून सुरावर/चालीवर म्हणता येईल या प्रमाणे रचना करणे म्हणजे पद्य होय
उदा.
-
आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके जरा जपून जा तुझ्या घरी
मात्रा -एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यास जो कालावधी (वेळ) लागतो त्यास मात्रा असे म्हणतात,ऱ्हस्व अक्षराची एक मात्रा तर दीर्घ अक्षराच्या दोन मात्रा मानतात .
उदा. क म ला
१ १ २
लघु गुरू - ऱ्हस्व अक्षरांना लघु तर दीर्घ अक्षरांना गुरु म्हणतात. लघु अक्षर अर्धचंद्राकृती ( U ) चिन्हाने दाखवतात , तर गुरु अक्षर आडव्या रेषेने (-) दर्शवतात.
लघुअक्षरे - अ इ उ ऋ तसेच हे स्वर मिसळून तयार झालेल्या अक्षरांना उदा. क, कि , कु,कृ, लघु (ऱ्हस्व) अक्षरे म्हणतात.
गुरूअक्षरे - आ,ई,ऊ,ऐ, ओ,औ, हे दीर्घ स्वर या हे मिसळून तयार झालेली अक्षरे जसे का, की,कू,के , कै, को, कौ, यांना गुरू (दीर्घ) अक्षरे म्हणतात