top of page

शब्दालंकार

या प्रकारात केवळ शाब्दिक चमत्कृती साधली जाते

अनुप्रास

कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो

उदा.

  • आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके जरा जपून जा तुझ्या घरी

  • गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले शीतल तनु चपल चरण अनिलगण निघाले

यमक

वेगवेगळ्या अर्थ असणाऱ्या परंतु उच्चारात समानता असणाऱ्या शब्दाचा वापर चरणात ठरावीक ठिकाणी केल्यामुळे जो नाद निर्माण होतो होऊन जे सौंदर्य प्राप्त होते त्यास यमक असे म्हणतात

उदा.

  • सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो

 

श्लेष अलंकार

या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो

उदा.

  • हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस (आयुष्य, पाणी)

  • मला एसटी लागते (गरज असणे,त्रास होणे)

Headquarter-Aurangabad, Maharashtra

pin code-431135

  • Instagram
  • यूट्यूब

© 2023 by Buddy Tayari. All Rights Reserved 

bottom of page