क्रियापद
क्रियापद
वाक्यातील क्रिया दर्शवणाऱ्या ज्या विकारी शब्दामुळे क्रिया दर्शवली जाते व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो वाक्यातील अशा क्रिया वाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात किंवा जे शब्द क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्यांना क्रियापद असे म्हणतात
उदाहरण -
-
विद्यार्थी रोज शाळेत जातात.
-
गाय दुध देते.
-
काढणे.
-
पळणे.
-
लिहिणे.
-
वाचणे.
-
गाणे.
क्रियापदाचे मुख्य दोन प्रकार पडतात
-
सकर्मक क्रियापद
-
अकर्मक क्रियापद
धातू
क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू असे म्हणतात.
उदा. कर, बोल, ये ,जा ,उठ ,बस, इत्यादी
सकर्मक क्रियापद
ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण होण्याकरिता कर्माची गरज असते,त्या क्रियापदाला सकर्मक क्रियापद असे म्हणतात
उदा.
-
राम आंबा खातो
-
अनुराग निबंध लिहितो
-
राम धार काढतो
-
पक्षी मासा पकडतो
अकर्मक क्रियापद
ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्याकडे साठी कर्माच्या आवश्यकता नसते, म्हणजे क्रिया कर्त्यापासून सुरू होते व कर्त्या पाशी थांबते त्यांना अकर्मक क्रियापद असे म्हणतात.
उदा.
-
मी बसलो.
-
राम पडला.
-
ती मोठ्याने हसली.
-
ती तेथे आली .
-
कानात वारे शिरले.