मागणी पत्र
दिनांक -१०-१०-२०१९
प्रति,
मा. व्यवस्थापक.
अक्षरमैत्रवाचनालय,
जुनेशहर,
अकोला- xxxxxx
विषय : पुस्तकांची मागणी करण्याबाबत.
महोदय,
आपण आयोजित केलेल्या दुर्मीळ पुस्तकांच्या प्रदर्शनास आम्ही हजेरी लावली. आमच्या शिक्षकांनी या पुस्तकांविषयी बरीच माहिती उपलब्ध करून दिली आणि शाळेच्या ग्रंथालयासाठी अशा पुस्तकांची आवश्यकता असल्याचेही सांगितले. शालेय प्रतिनिधी या नात्याने मी सुजय कुलकर्णी आपल्या वाचनालयामार्फत काही पुस्तके मागवू इच्छितो. त्यांची यादी पुढे देत आहे. तसेच शाळेचा ई-मेल पत्ताही पाठवत आहे. पुस्तकांची एकूण देय रक्कम, टपालखर्च ई-मेलद्वारे कळवावा, तसेच आपल्या बँक खात्याचा तपशीलही कळवावा, म्हणजे मी शाळेतर्फे ती रक्कम आपल्या खात्यात त्वरित ऑनलाइन जमा करीन.
पुस्तकांची यादी :

हे पत्र मी माननीय मुख्याध्यापकांच्या अनुमतीने पाठवत आहे.
कळावे,
आपला नम्र,
सुजय कुलकर्णी
(शालेय विदयार्थी प्रतिनिधी)
आदर्श विदयालय,
अकोला- XXX XXX
e-mail : abc@xxxx.com