सारांशलेखन
-
खालील अपठित उताऱ्याचा १/३ एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
कोट्यवधी वर्षांपूर्वी पृथ्वी सूर्यापासून अलग झाली. ती हळूहळू थंड होत गेली. तिच्यावर जी माती निर्माण झाली तीतूनच पुढे जीव जन्माला आले. सुरुवातीला या जगात जन्माला आलेला जीव म्हणजे वनस्पतीच तर होता. त्यातून हळूहळू उत्क्रांती होत मानवाची निर्मिती झाली. जगात निर्माण झालेली ती पहिली वनस्पती हे जर एक टोक मानलं तर मनुष्य हे त्या साखळीचं दुसरं टोक आहे असं म्हणता येईल. म्हणूनच मलाही वाटतं, की माणूस हा झाडासारखा आहे. ऊन, सावली, थंडी, उष्णता या सगळ्यांचा जसा झाडांवर परिणाम होतो, तसाच तो माणसांवरही होतो. आसपासच्या वातावरणामुळे माणसाचा स्वभाव बदलतो, त्याचा रक्तदाबसुद्धा बदलतो. म्हणूनच मनुष्य हा देखील एक झाडच आहे. त्यामुळेच झाडांशी आपलं फार पूर्वीपासूनचं कौटुंबिक नातं आहे असं मला वाटतं. पिंपळ हा पुरातन वृक्ष तर आमच्या पूर्वजांसारखाच आहे.
सारांशलेखनः
पृथ्वीच्या निर्मितीत उत्क्रांतीचा प्रवास वनस्पतींपासून माणसापर्यंत येऊन ठेपन आहे. म्हणूनच माणूस आणि झाड यांच्यात बरेच साम्य आढळून येते. वातावरणातील घटकांचा परिणाम जसा वनस्पतींवर होतो तसाच माणसावरही होतो. सृष्टीचे सर्व निक माणसाला आणि झाडाला सारखेच लागू पडतात असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही